Home अहमदनगर अहमदनगर: मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

अहमदनगर: मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

Ahmednagar News:  मुळानदी पात्रात एका अंदाजे 55 वर्ष वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह (Dead Body) पाण्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

woman's Dead body was found in the Mula riverbed

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात मुळानदी पात्रात एका अंदाजे 55 वर्ष वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात आढळून आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुळानदी पात्रात काही आदिवासी बांधव मासेमारी करण्यासाठी गेले असता त्यांना एका अनोळखी महिलेचा मृतदेह पालथ्या अवस्थेत नदीपात्रात पाण्यात तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती राहुरी पोलीसांना कळवली. राहुरी पोलीसांच्या पथकाने घटनास्थळी येऊन महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृतदेह जास्त दिवस पाण्यात राहिल्याने कुजलेल्या अवस्थेत व दुर्गंधी येत असल्याने या मृत महिलेची ओळख पटविण्यात अडथळा निर्माण झाला. या मृत महिलेच्या अंगावर पिवळसर रंगाची साडी आहे.

या कामी राहुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी भर पावसात मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली. मृतदेह उत्तर तपासणी साठी राहुरी येथे नेण्यात आला आहे. या अनोळखी महिलेच्या मृत्यूविषयी परिसरात घातपात की आत्महत्या? या विषयी तर्कविर्तक चर्चेतून काढले जात आहे. या घटनेचा अधिक तपास राहुरी पोलीस करीत आहे.

Web Title: woman’s Dead body was found in the Mula riverbed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here