Akole News: कळसुबाई शिखरावर एका बेवारस महिलेचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याची घटना.
अकोले: अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखरावर एका बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. सदर महिलेचा मृतदेह घोटी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर समजल्या जाणा-या कळसुबाई शिखरावर शनिवारी एका महिलेचा बेवारस मृतदेह आढळुन आला आहे. सदर महिला ही ३५ ते ४० वर्षांची आहे. मृतदेह शिखरावर असल्याची माहीती अगोदर राजुर पोलिसांना मिळाल्यानंतर राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे याच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. दिलीप डगळे व ईतर सहका-यांनी थेट गडावर जात मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला परंतु सदर महिलेचा मृतदेह हा घोटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असल्याकारणाने घोटी पोलिसांना सदर घटनेची माहीती देण्यात आली घोटी पो. स्टेशन चे पो उपनिरीक्षक संजय कवडे, बीट अमतदार सुहास गोसावी व शिवाजी शिंदे यांनी जागेवर जात मृतदेह ताब्यात घेतला आहे. सदर महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असुन कुणाता महितेबद्दल माहीती असल्यास घोटी पोलिस स्टेशन बरोबर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे
सदर महिला ही गत पाच ते सहा दिवसांपासुन शिखरावर फिरत असल्याची माहीती ऐकावयास मिळत असुन ती मानसिक रुग्ण असण्याची शक्यता आहे. मंदिरामध्ये भक्ताना ती दर्शनासाठी मज्जाव करत होती. अशीही माहीती उपलब्ध होत आहे.
Web Title: woman’s Dead body was found on Kalsubai Peak
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App