Home पुणे महिलेचा अर्धवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

महिलेचा अर्धवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

Pune News: एका 30-35 वर्षीय महिलेचा अर्धवस्त्र अवस्थेतील मृतदेह (Dead  body) आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली.

woman's half-clothed Dead body was found, causing great excitement

पुणे:  कोंढवा परिसरातील मेफेअर सोसायटीजवळील साई मंदिराच्या  पाठीमागे मोकळ्या मैदानात एका 30-35 वर्षीय महिलेचा अर्धवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहचले असून मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रुग्णालयात  दाखल करण्यात आल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले आहे.

याबाबत माहिती अशी की, सोमवारी सकाळी 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान, एनआयबीएम रोडवर एका मोकळ्या मैदानात अर्धवस्त्र अवस्थेतील महिलेचा मृत असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली. कोंढवा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कोंढव्यातील मेफेअर सोसायाटीजवळील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलसांनी तात्काळ मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रूग्णालयात दाखल केला आहे  अद्याप ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

Web Title: woman’s half-clothed Dead body was found, causing great excitement

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here