Home Accident News Accident: ट्रकने सायकलला धडक दिल्याने अपघात, कामगाराचा मृत्यू

Accident: ट्रकने सायकलला धडक दिल्याने अपघात, कामगाराचा मृत्यू

Parner Accident News:  कामगाराला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने अपघात, कामगाराचा मृत्यू.

Worker killed in accident due to truck hitting bicycle

पारनेर: पारनेर तालुक्यातील हंगा येथुन सायकलवरुन सुपा एमआयडीसीत येत असलेल्या कंपनीतील कामगाराला ट्रकने पाठीमागुन धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात सायकलवरील कामगाराचा मृत्यू झाला आहे .

याप्रकरणी बिबादेवी राजाराम माथुर यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझे पती मयत राजाराम किसन माथुर (वय ५२ रा. वांद्रे मुंबई हल्ली मुक्कामी हंगा तालुका पारनेर) हे सोमवारी रात्री हंगा येथुन सुपा येथील कंपनीत कामासाठी येत असताना सुपा पारनेर वरील हंगा शिवारत रात्री ८.०० वाजेच्या सुमारास पारनेरकडून सुप्याच्या दिसेने येत आसलेल्या ट्रक क्रमांक (MH 16 T 7307) ने माझ्या पतीला जोराची धडक दिली यात ते गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी झाले.

सदर घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व सदर जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. सुपा पोलिसांनी ट्रकचालक संतोष धोंडीबा चत्तर यांच्यावर गुन्हा दाखल केला असुन पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Worker killed in accident due to truck hitting bicycle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here