Home महाराष्ट्र पत्नी म्हणून माझा स्वीकार करावा- करुणा मुंडे

पत्नी म्हणून माझा स्वीकार करावा- करुणा मुंडे

Breaking News | Karuna Mundhe: माझ्या दोन मुलांसह माझा धर्मपत्नी म्हणून त्यांनी स्वीकार करावा.

You should accept me as your wife - Karuna Munde

मुंबई: राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा, अशी मागणी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत स्वराज्य सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी केली आहे. करुणा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांनी त्यांचा गैरवापर केला.

त्यांच्यापासून तिला दोन अपत्ये झालेली आहेत. माझ्या दोन मुलांसह माझा धर्मपत्नी म्हणून त्यांनी स्वीकार करावा. धनंजय मुंडे यांच्याकडून बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मला व माझ्या कार्यकत्यांना मारहाण करण्यात आली, माझ्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात मी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनाही निवेदन दिले आहे. परंतु माझ्या निवेदनाला केराची टोपली दाखवली जात आहे.

त्याचप्रमाणे यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिले आहे. परंतु मला न्याय मिळाला नाही. त्यामुळे मी स्वतःचा पक्ष काढून त्यातून पुढील लढा लढवण्याचा निश्चय घेतला आहे.

Web Title: You should accept me as your wife – Karuna Munde

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here