Home पुणे धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडूनच तरुण मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडूनच तरुण मुलीवर लैंगिक अत्याचार

Pune Crime: sexually assaulted सख्ख्या बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला.

young girl is sexually assaulted by her own father

पुणे: राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे, सख्ख्या बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम पित्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पित्याचे वय 51 वर्ष इतके आहे. तर पीडित तरुणीचे वय 19 आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी आणि तिचे वडील असे दोघेच घरात होते. त्यावेळी आरोपी नराधम पित्याने पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले.

तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलीने कशीबशी आपली सुटका केली. तिथून सुटका केल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसात धाव घेतली. तसेच घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. अखेर चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी पित्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: young girl is sexually assaulted by her own father

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here