Home अकोले अकोले: पोलिस पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

अकोले: पोलिस पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Akole Suicide Case:  तरुणांने घराचे पडवीत लोखंडी  पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

A young man commits suicide after getting tired of police wife and her lover's interrogation

अकोले:  पोलिस पत्नीचे प्रियकराला बरोबर असलेले प्रेमसंबध गावात कळाल्याने बदनामी झाली तसेच पत्नी व तिच्या प्रियकराकडुन वेळोवेळी दिलेल्या त्रासामुळे तालुक्यातील निब्रळ येथील २८ वर्षीय  तरुणांने घराचे पडवीत लोखंडी  पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत तरुणांचे वडिलांनी अत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अकोले पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

याबाबत तरुणांचे वडिल कैलास कैलास विठ्ठल वाकचाैरे ( रा.निब्रळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि फिर्यादीचा मुलगा अमोल कैलास वाकचाैरे याने गावातीलच करुणा राधाकिसन सोनवणे (ह.मु.पोलिस मुख्यालय कळंबोली, मुंबई) हिच्याबरोबर ०५/११/२०१८ रोजी प्रेमविवाह केला होता विवाहानंतर दोघे मुंबई येथे राहावयास गेले होते त्यानंतर  दोघात वाद होऊ लागल्याने मुलगा दोन वर्षापासून गावी निब्रळ येथे राहत होता.

त्यास कारण विचारले असता त्याने सांगितले कि त्याची पत्नी करुणा अमोल वाकचाैरे हिचे योगेश गोसावी( मु.रा.नादगाव, जि.नाशिक) याचे बरोबर अनैतिक संबंध असल्याचे मला माहित झाल्याने वाद झाले व पत्नी करुणा व तिची आई प्रतिभा सोनवणे यांनी २३ /०९/२०२१ रोजी मारहाण करुन मुंबई येथून घराबाहेर काढून दिले होते.त्यानंतर आम्ही सुन करुणा हिच्या मामाचे घरी बैठक घालून करुणा हिस नांदावयास येणेबाबत विनवणी केली होती. दोन महिन्यापासून सुन करुणा हि पती अमोल यास वारंवार फोन करुन मला तुझ्याबरोबर राहायचे नाही. तु माझ्या लायकीचा नाही असा त्रास देत होती तसेच पत्नी करुणा माहेरी निब्रळ गावात आली असता घरी येत नसे तसेच तिचा प्रियकर योगेश गोसावी बाबत असलेले अनैतिक संबंधाची गावात माहिती होउन बदनामी झाल्याचे भावनेने मुलगा मानसिक तणावाने तो झुरत होता.

त्यात दोन दिवसांपूर्वी करुणा हि माहेरी निब्रळ येथे आलेली असताना मुलगा अमोल व पत्नी करुणा यांचे फोनवर संभाषण होऊन परत भांडण झाले होते.एकूणच सुन करुणा व योगेश गोसावी यांचे प्रेमसंबंध संपूर्ण गावाला समजल्यामुळे तसेच सुन करुणा हिने माणसिक त्रासामुळे मुलगा अमोल याने दि १/१०/२०२२ रोजी रात्री ९ वाजणेचे सुमारास राहते घराजवळ शेडच्या लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याने त्यास अत्महत्येस  त्याची पत्नी करुणा अमोल वाकचाैरे, तिचा प्रियकर योगेश गोसावी, संकेत राधाकिसन सोनवणे,प्रतिभा राधाकिसन सोनवणे यांनी प्रवृत्त केले असल्याचे म्हटले आसल्याने अकोले पोलिस स्टेशनला गु.र.न.४४८/२०२२ भा.द.वी.कलम ३०६,२३ ,५०५,५०६,३४ प्रमाणे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास प्रभारी पोलिस निरिक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हांडोरे करत आहे .

Web Title: A young man commits suicide after getting tired of the police wife and her lover’s interrogation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here