Home Suicide News खोटा गुन्हा दाखल केल्याने अकोलेतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खोटा गुन्हा दाखल केल्याने अकोलेतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Young man commits suicide by strangulation in Akole

अकोले | Suicide: नाशिक पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केल्याने नैराश्यात असलेल्या अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील सुदर्शन चंद्रकांत राजगुरू वय २२ या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या तरुणाने आत्महत्यापूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली असून त्यात त्याने गंगापूर नाशिक येथील रहिवासी असलेले महेश पाटील आणि त्यांची पत्नी सरला पाटील यांनी मला खूप मानसिक त्रास दिला असून त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याने मला २ महिने तुरुंगवास झाला. या खोट्या गुन्ह्याने माझी समाजात बदनामी झाली. तसेच हा गुन्हा मागे घेण्यासाठी माझ्या वडिलांकडे २ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आमची परिस्थिती हलाखीची असल्याने इतकी मोठी रक्कम आम्ही देऊ शकत नाही असे सुसाईट नोटमध्ये म्हंटले आहे. त्यामुळे माझ्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या महेश पाटील आणि सरला पाटील यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशा आशयाची सुसाईड नोट सुदर्शन याने आपल्या खिशात लिहून ठेवली होती. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी मृतांच्या नातेवाईक यांच्यासोबत चर्चा करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी सांगितले आहे.   

Web Title: Young man commits suicide by strangulation in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here