Home अहमदनगर Suicide: उसने दिलेले पैसे परत न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

Suicide: उसने दिलेले पैसे परत न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

A young man commits suicide due to non-repayment of the loan

अहमदनगर | Ahmednagar: उसने दिलेले चार लाख परत न मिळाल्याने तणावात आलेल्या  तरुणाने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे.   गणेश कोंडीबा  कोतकर (रा. कोतकर वस्ती, निंबळक ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चार लाख घेतलेल्या व्यक्तीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळू ऊर्फ बाळासाहेब जगन्नाथ कोतकर (रा. निंबळक ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत गणेश कोतकर यांचा भाऊ संदीप कोंडिबा कोतकर यांनी फिर्याद दिली आहे. गणेश कोतकर यांनी बाळू कोतकर याला मागील सहा ते सात महिन्यांपूर्वी हात उसने चार लाख रुपये दिले होते. गणेश यांनी बाळूकडे चार लाख रुपयांची वेळोवेळी मागणी करून देखील त्याने ते पैसे दिले नाहीत. त्यामुळे गणेश हा डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली.

वाचा: Ahmednagar News

बाळूने चार लाख परत केले नाही  म्हणून गणेशने विषारी पदार्थ घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.

Web Title: A young man commits suicide due to non-repayment of the loan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here