Home अहमदनगर अहमदनगर: शेतातील झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

अहमदनगर: शेतातील झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

Ahmednagar News:  शेतातील झाडाला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

young man committed suicide by hanging himself from a tree in the field

पारनेर:  शेतातील झाडाला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पिंपरी गवळी येथे शनिवारी उघडकीस आली. गणेश बाळासाहेब चहाळ (वय 36) असे तरुण युवकाचे नाव आहे. आत्महत्या मागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

याबाबत दत्ताञ्य बाळासाहेब चहाळ यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या खबरीत म्हटले आहे की,  आमचे बंधू गणेश बाळासाहेब चहाळ यांनी शनिवार (दि 2) रोजी सकाळी सात वाजण्याच्या अगोदर आमच्या शेतातील लिंबाच्या झाडाला केबलच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांनी ताबडतोब त्यास पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे त्यास मयत घोषीत केले.

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेत पंचनामे केले व दत्ताञ्य चहाळ यांच्या फिर्यादीवरुन अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. आत्महत्येचे अद्याप समोर आले नसून सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसइ पठाण अधिक  तपास करत आहेत .

Web Title: young man committed suicide by hanging himself from a tree in the field

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here