Home नाशिक तरुणाची लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, चिठ्ठीत लिहून गेला, दोघं जण…

तरुणाची लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, चिठ्ठीत लिहून गेला, दोघं जण…

Nashik: पावणे दोन लाख रुपयांना कार खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे देऊनही विक्रेत्यासह एकाने मानसिक त्रास दिल्याने त्रासलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या (Suicide).

Young man committed suicide by hanging himself in a lodge, wrote in the note

नाशिक: पावणे दोन लाख रुपयांना कार खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे देऊनही विक्रेत्यासह एकाने मानसिक त्रास दिल्याने त्रासलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  सिद्धेश सुरेंद्र कदम (वय २५, रा. आदर्श चाळ, कळवा, ठाणे) असे आत्महत्या केलेल्या मृत तरुणाचे नाव आहे. नाशिकरोड परिसरातील लॉजमध्ये त्याने आत्महत्या केल्याने ठाण्यातल्या दोन संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळील कैलास लॉजमध्ये सिद्धेश कदम याने गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्याजवळील ‘सुसाइट नोट’नुसार सिद्धेशचे वडील सुरेंद्र गोविंद कमद (वय ५५ रा. ठाणे) यांनी नाशिकरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यान्वये, उमेश दिलीप ठाकूर (रा. सूर्यनगर विटावा, कळवा, ठाणे) आणि किरण जिजाभाऊ हिंगे (रा. कळवा, ठाणे) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, सिद्धेश याने ६ जून रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी दाखल अकस्मात मृत्यूचा सखोल तपास नाशिकरोड पोलिसांनी केला. सिद्धेशजवळ मिळालेल्या ‘सुसाईड नोट’नुसार त्याच्या वडिलांना माहिती देण्यात आली. सिद्धेशच्या वडिलांनी त्यानुसार गुरुवारी (दि.२२) रात्री फिर्याद नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी संशयितांच्या चौकशीसाठी एक पथक ठाणे शहरात रवाना केले आहे.

सिद्धेश कदम याने संशयित ठाकूरकडून सन २०२२ मध्ये एक कार १ लाख ७२ हजारांना घेतली. त्याचे उर्वरित पैसे त्याने संशयित हिंगेकडे देत ठाकूरला देण्यास सांगितले. मात्र, हिंगेने पैसे दिलेच नाही. व्यवहार पूर्ण करूनही पैसे न मिळाल्याचे सांगत संशयितांनी सिद्धेशची दुचाकी ताब्यात घेतली. त्यामुळे सिद्धेश हा कायम तणावात असायचा. त्याला दोन्ही संशयित त्रास देत असल्याचा दावाही त्याने ‘सुसाइड नोट’मध्ये केला आहे. त्यामुळे सिद्धेश ठाण्यातून नाशिकमध्ये आला. लॉजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने भाड्याचे पैसे घेण्यासाठी दरवाजा ठोठावला. तेव्हा, ६ जून रोजी दुपारी चार वाजता सिद्धेशने गळफास घेतल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी अकस्मात मृत्यूच्या तपासात त्यामागील कारणाचा उलगडा झाला आहे.

Web Title: Young man committed suicide by hanging himself in a lodge, wrote in the note

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here