Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: ट्रॅक्टरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: ट्रॅक्टरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Young man crushed to death under a tractor

Ahmednagar | Karjat | कर्जत: शेतात काम चालू असताना ट्रॅक्टर  मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने एका तरुण चिरडून ठार (Death) झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील नागलवाडी शिवारात घडली आहे. ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करणयात आला आहे.

विठ्ठल रमेश शिंगटे (वय २५, नागलवाडी, ता. कर्जत) असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.  याप्रकरणी येथील शेतकरी रमेश शंकर शिंगटे यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये  फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार त्यांच्या शेतामध्ये माती ट्रेलर मध्ये भरण्याचे काम सुरू असताना. ट्रेलर ट्रॅक्टरला जोडला जात होता. यावेळी विठ्ठल शिंगटे हा ट्रेलरचा सुकाणु धरून उभा होता.

तर ट्रॅक्टर चालक बळीराम नानासाहेब नलावडे यांनी त्यासाठी ट्रॅक्टर मागे घेताना त्यांचा अचानक ताबा सुटल्याने ट्रॅक्टर जोरात मागे येऊन त्याठिकाणी उभा असणारा विठ्ठल शिंगटे यांच्या पोट आणि छाती वरून ट्रॅक्टरचे मोठे टायर गेल्याने  तो जागेवरच मृत्यू झाला.  याप्रकरणी रमेश शिंगटे यांच्या तक्रारीवरून  चालक बळीराम नलावडे याच्याविरोधात कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा (Crime Filed) दाखल करण्यात आला असून त्यास अटक (Arrest) करण्यात आली  आहे.

Web Title: Young man crushed to death under a tractor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here