Home अहमदनगर अहमदनगर: खडीने भरलेला डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू  

अहमदनगर: खडीने भरलेला डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू  

Ahmednagar | Jamkhed News: खडीने भरलेल्या डंपरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू (died).

Young man died after being crushed under a dumper full of gravel

जामखेड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास काम करणाऱ्या कामगारास खडीने भरलेल्या डंपरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शहरातील नायरा पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

गणेश बापू फुलमाळी (वय २०, रा. कानडी, ता. आष्टी, जि. बीड) हा कामगार काम करत होता. त्याचवेळी खडीने भरलेला डंपर (क्र. एमएच १२ एसएक्स ४१८५) या कामगाराच्या अंगावरून गेला. यामुळे फुलमाळी याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Young man died after being crushed under a dumper full of gravel

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here