Home क्राईम संगमनेर: दुचाकी शिकविण्याच्या बहाण्याने तरुणाकडून मुलीचा विनयभंग

संगमनेर: दुचाकी शिकविण्याच्या बहाण्याने तरुणाकडून मुलीचा विनयभंग

Sangamner Crime: शहरातील संजय गांधी नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने ओळखीतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molested) केल्याची घटना समोर आली. विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्यान्वय्यै (पोक्सो अंतर्गत) गुन्हा.

young man molested a girl on the pretext of teaching her to ride a bike

संगमनेर: शहरातील संजय गांधी नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने ओळखीतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष रामू धोत्रे याच्या विरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्यान्वय्यै (पोक्सो अंतर्गत) गुन्हा दाखल केला. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर नगरपालिकेच्या थोरात क्रीडा संकुलाजवळील संजयगांधीनगरमध्ये राहणाऱ्या संतोष धोत्रे या तरुणास 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने दुचाकी शिकविण्याची विनंती केली होती. त्याने तिला दुचाकी चालविण्याचे शिकविताना तिच्याशी जवळीक साधली. ‘तू मला खूप आवडते, तुझे लग्न होत नाही तोपर्यंत माझ्याशी संबंध ठेव,  असे म्हणत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने तेथेच दुचाकीवरून उतरून घराकडे पळ काढला. घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. यानंतर संतप्त झालेल्या तिच्या आईने रात्री उशिरा शहर पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय जेतला. यानंतर मुलीच्या आईने संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष राम धोत्रे (रा. संजय गांधीनगर) याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याचे (पोक्सो) कलम 12 नुसार गुन्ह्याची नोंद केली. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक निकिता महाले या करीत आहे.

Web Title: young man molested a girl on the pretext of teaching her to ride a bike

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here