Home क्राईम प्रेमविवाहानंतर तरुणीने संपवलं जीवन; १ वर्षाची चिमुकली पोरकी

प्रेमविवाहानंतर तरुणीने संपवलं जीवन; १ वर्षाची चिमुकली पोरकी

एका प्रेमविवाह केलेल्या तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Young woman ends life Suicide after love marriage 1 year old baby

Bhandara Crime News :भंडारा जिल्ह्यातून एक भयावह घटना समोर आली आहे. येथील पवनी तालुक्यात एका प्रेमविवाह केलेल्या तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

स्नेहा राहुल कावळे ( वय २५ वर्ष रा. आझाद चौक, पवनी) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी स्नेहाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. राकेश कावळे असं आरोपी पतीचं नाव आहे.

अधिक माहिती अशी की,  भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शिवनाळा येथील स्नेहा हिचा पवनी येथील राहुल कावळे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर एका वर्षाने स्नेहाने एका गोंडस बाळाला जन्मही दिला. मात्र, काही दिवसांच्या सुखी संसारानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. राहुल याने स्नेहाला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. तसेच दारू पिऊन त्याने स्नेहाला मारहाण करण्यास सुरूवात केली.

सुरूवातीला स्नेहाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दरवेळी राहुलकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून तिने याची माहिती आपल्या वडिलांना दिली. दरम्यान, स्नेहाच्या वडिलांनी राहुल याची समजूत काढली. रविवारी स्नेहाच्या चुलत भावाचे लग्न असल्याने ती आपल्या माहेरी आली होती.

यावेळी राहुललने तिला परत मारहाण केली. त्यामुळे ती मानसिक तणावात गेली. हे असंच सुरू राहिलं तर मी एकेदिवशी जीव देईन, असं स्नेहाने आपल्या वडिलांना सांगितलं. दरम्यान, मंगळवारी स्नेहा आणि राहुल यांच्यात पुन्हा वाद झाला. यातून स्नेहाने विषारी औषध प्राशन केले.

सासरच्या मंडळींनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्नेहाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी (Police) राहुल कावळेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Young woman ends life Suicide after love marriage 1 year old baby

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here