Home क्राईम संगमनेर: गावठी पिस्तूल-गोळ्यांसह तरुणाला अटक, धक्कादायक कारण आले समोर

संगमनेर: गावठी पिस्तूल-गोळ्यांसह तरुणाला अटक, धक्कादायक कारण आले समोर

Sangamner Crime:  गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन राउंड जवळ बाळगणाऱ्या श्रीरामपूर येथील २६ वर्षीय युवकाला पकडण्यात आले असल्याची कारवाई/

संगमनेर: गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन राउंड जवळ बाळगणाऱ्या श्रीरामपूर येथील २६ वर्षीय युवकाला पकडण्यात आले असल्याची कारवाई करण्यात आली आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने संगमनेर तालुका पोलिसाचे पथक हॉटेल, लॉजिंग तपासणी आणि नाकाबंदी करत होते. यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडगावपान-समनापूर रस्त्यावर बुधवारी (दि. २९) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

अजिम ऊर्फ अजू अन्वर पठाण (रा. श्रीरामपूर) असे आरोपी युवकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस नाईक राजेंद्र लांघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.  पोलिसाचे पथक हॉटेल, लॉजिंग तपासणी आणि नाकाबंदी करत असताना त्यांना रस्त्याने जाणाऱ्या एका युवकावर संशय आल्याने त्यांनी त्याला थांबविले. त्याची अंगझडती घेतली तेव्हा  त्याच्या कमरेच्या पट्टयाला गावठी बनावटीचे पिस्तूल आणि त्यात दोन राउंड पोलिसांना आढळून आले.

याप्रकरणी धक्कादायक कारण आले समोर, पठाण याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, हे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन राउंड कल्याण येथून आणत श्रीरामपूर येथे विक्रीसाठी घेऊन चालला असल्याचे समजले. त्याने हा कट्टा, राऊंड कोठून आणि कुणाकडून घेतले आणि तो कुणाला विकणार होता, याचा तपास पोलिस करत आहेत. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.  पोलिस निरीक्षक देविदास दुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शालोमन सातपुते, शिवाजी डमाळे, राहुल डोके, यांनी ही कारवाई केली.

महत्वाचे:

आपला App अपडेट करा प्ले स्टोर ला जाऊन लिंक: पुढीलप्रमाणे अपडेट लिंक 

Web Title: Youth Arrested with Gavathi Pistol Bullets

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here