ब्रेकिंग: प्रवरा नदीत उडी मारून तरूणाची आत्महत्या
Ahmednagar News: बेलापूर येथील प्रवरा नदीच्या पुलावरून नदीत उडी मारत तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
श्रीरामपूर | Shrirampur: बेलापूर येथील प्रवरा नदीच्या पुलावरून नदीत उडी मारत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. चांदेगाव येथील अक्षय राजेंद्र गांगुर्डे असे आत्महत्या केलेल्या या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय याला पुलावरून उडी मारत असताना पुलावरून जाणारे महेश ओहोळ, लखन दुंडे यांनी त्याला आवाज देईपर्यंत त्याने उडी मारली. परिसरातील नागरिकांनी ताबडतोब जाऊन अक्षय याला बाहेर काढले परंतु तो मयत झाला होता. अक्षयच्या वडिलांनी देखील यापूर्वी आत्महत्या केलेली आहे. आई अपंग असून तिनेच अक्षयला लहानचे मोठे केले होते. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Web Title: Youth committed suicide by jumping into Pravara river
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App