Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग! तिहेरी अपघातात तरुणाचा मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग! तिहेरी अपघातात तरुणाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: रुग्णवाहिका, एर्टिगा कार व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी अपघातात (Accident) तालुक्यातील खलालपिंपरी येथील दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू.

Youth dies in triple accident

नेवासा: नेवासा फाटा रोडवर संभाजीनगर कमानी समोर इनामदार यांच्या गाळ्यासमोर रुग्णवाहिका, एर्टिगा कार व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी अपघातात तालुक्यातील खलालपिंपरी येथील दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२ बाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, दुपारी बारा वाजता नेवासा येथील साईराज टेलर दुकानाचे मालक गणेश चंद्रकांत कोरेकर (वय ३८) हे त्यांच्या प्लॅटिना (एमएच १७ एवाय ३८५७) या दुचाकीवर नेवासा फाटाकडे जात असताना रुग्णवाहिका व गणेश कोरेकर एटिंगा (एमएच १२ बीबी २१७२) यांच्यासह झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात गणेश चंद्रकांत कोरेकर हे गंभीर जखमी झालेऋ त्यांना नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती पोलीस हवालदार संतोष धोत्रे यांनी दिली.

दरम्यान रात्री उशिरा कोरेकर यांच्यावर खलालपिंपरी येथे शोकाकुल बातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नेवासा शहरातील औदुंबर चौकात साईराज टेलर हे दुकान ते चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आहे. पुढील तपास हवालदार संतोष धोत्रे हे करीत आहेत.

Web Title: Youth dies in triple accident

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here