Home संगमनेर संगमनेर तालुक्यात तरुणाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू

संगमनेर तालुक्यात तरुणाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू

youth drowned in a well in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील नानज दुमाला येथे विहिरीतील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करणयात आली आहे. 

संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सागर भास्कर कोळपे वय २२ असे विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सागर हा गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास शेतात कांद्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता. शेतातील विहीरीवर विद्युत मोटार चालू करण्यसाठी गेला असता त्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने सागरचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर मृतदेह विहिरीतून काढण्यासाठी पाण्याचा उपसा करून काढण्यात आला. तब्बल सहा तासानंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेने नानज दुमाला गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: youth drowned in a well in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here