Home अहमदनगर Mula Dam: मुळा धरणात तरुणाचा बुडून मृत्यू

Mula Dam: मुळा धरणात तरुणाचा बुडून मृत्यू

Mula Dam Drowned: नगर शहरातील एक पर्यटक बुडाल्याची घटना, प्रत्येक वर्षी या ठिकाणी पर्यटक बुडाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 

Youth drowned in Mula Dam

राहुरी:  रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी आनंद लुटण्यासाठी गर्दी केली होती. परंतु दुपारी आनंदावर विरजण पडले आहे. धरणाच्या पाण्यात उतरलेला नगर शहरातील एक पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सायंकाळी ५:३० वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

चेतन कैलास क्षीरसागर (वय 38, रा. श्रमिकनगर, पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक, सावेडी, अहमदनगर) असे मृताचे नाव आहे. मृत चेतन समवेत त्याचे मित्र बाळकृष्ण धारुणकर, सोमनाथ देवकर, बाळासाहेब शिंदे, संतोष मेहत्रे, निलेश धारुणकर, बाळासाहेब जुंदरे, संदीप शिंदे, आशुतोष भागवत, राजेंद्र करपे, योगेश पतले, नितीन फल्ले, मिलिंद शिरसागर (सर्वजण रा. अहमदनगर) असा 13 जणांचा ग्रुप धरणावरनिसर्गाचा  आनंद लुटण्यासाठी  पर्यटनासाठी आला होता

धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकी जवळून आत जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळे, जलसंपदाच्या कर्मचारी वसाहतीमधील रस्त्याने सर्वजण चमेली गेस्ट हाऊस जवळ गेले. गेस्ट हाऊस समोरील पटांगणात सर्वांनी आपल्या समवेत आणलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला. सायंकाळी चार वाजता चमेली गेस्ट हाऊसच्या मागील बाजूस धरणाच्या पाण्यात पोहोण्यासाठी काहीजण उतरले होते.

तेथील खोल पाण्यात उतरलेला चेतन क्षीरसागर दमछाक होऊन पाण्यात बुडाला. मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस नाईक गणेश सानप यांनी सायंकाळी साडेपाच वाजता स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्षी पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: Youth drowned in Mula Dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here