Home Accident News संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर कारच्या धडकेत युवक ठार

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर कारच्या धडकेत युवक ठार

Sangamner News:  रायतेवाडी फाटा येथे दुचाकीस्वार गतीरोधकावरून जात असतांना पाठीमाहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक (Accident) दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

Youth killed in car collision on Nashik Pune highway Accident

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे दुचाकीस्वार गतीरोधकावरून जात असतांना पाठीमाहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. अनिल हरिभाऊ खुळे (रा. रायतेवाडी फाटा) असे या अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल हरिभाऊ खुळे हे रायतेवाडी फाटा येथे असणाऱ्या गतीरोधकातून दुचाकीवरून जात होते परंतू याचवेळी या गतीरोधकाचा अंदाज न आल्याने स्वीफ्ट कारने या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर मार लागल्याने यात अनिल खुळे यांच्या जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलीसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या कार चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Youth killed in car collision on Nashik Pune highway Accident

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here