फिरण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
Ahmednagar News: युवकाचा डबक्यात पडून बुडाल्याने (Drowned) मृत्यू.
अहमदनगर: डोंगरगण ता. नगर शिवारात मित्रांबरोबर फिरण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदित्य अनिल काळे वय १७ रा. गांधीनगर, बोल्हेगाव असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आदित्य हा त्याच्या 9 ते 10 मित्रांसोबत डोंगरगण येथे फिरण्यासाठी गेला होता. तेथे असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडून आदित्याचा मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रूग्णालयात आदित्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Web Title: youth who went for a walk drowned in water