Home अहमदनगर मित्रांबरोबर पोहोण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू

मित्रांबरोबर पोहोण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू

Ahmednagar:  युवकाचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू (died).

youth who went swimming with his friends died after his foot slipped and fell into a ravine

अहमदनगर: मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  विनायक संजय सदलापूरकर (वय 17 रा. भिंगार) असे मयत युवकाचे नाव आहे.  बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विळद (ता. नगर) शिवारातील फॉरेस्टमधील धबधब्याच्या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पावसाळा सुरू असल्याने निसर्गरम्य परिसर असलेल्या विळद शिवारातील फॉरेस्टमधील धबधब्याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. भिंगार येथील विनायक सदलापूरकर हा देखील त्याच्या सहा मित्रांसोबत बुधवारी विळद शिवारातील धबधब्याच्या ठिकाणी पोहण्यासाठी गेला होता. सदर ठिकाणी त्याचा पाय घसरून तो खोल दरीत पडला. त्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. विनायकचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

Web Title: youth who went swimming with his friends died after his foot slipped and fell into a ravine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here