Home क्राईम धक्कादायक! घरातच सुरू होता वेश्या व्यवसाय;  पोलिसही चक्रावले

धक्कादायक! घरातच सुरू होता वेश्या व्यवसाय;  पोलिसही चक्रावले

Latur prostitution business at home

लातूरः स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी परज्यातून मुलींना आणि महिलांना बोलावून घरामध्येच सुरु होता वेश्या व्यवसाय (prostitution business). पोलिसांनी धाड टाकून दोन महिलांसह सात जणांना लातूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लातूर शहरातील एमआयडीसी परिसरात परराज्यातून नागरिकांची संख्या अधिक आहे. याचाच फायदा घेत लातूर एमआयडीसी परिसरात दोन महिला परराज्यातून काही मुलींना आणि महिलांना बोलावून आपल्या घरामध्येच वेश्या व्यवसाय (prostitution business) करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून  मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी परिसरातील त्या ठिकाणी छापा मारला. तेथे सुरु असलेला प्रकार पाहून पोलीसही चक्रावले.

त्याठिकाणी दोन महिलांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी परराज्यातून मुलींना आणि महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय (prostitution business) करवून घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोन महिलांसह एक एजंट, चार ग्राहक अशा सात जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील तीन पीडित महिलांची वेश्या व्यावसायातून सुटका करण्यात आली. तर इतर आरोपींना एक दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर करीत आहेत.

Web Title: Latur prostitution business at home

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here