Home गोंदिया १६ वर्षाच्या मुलीवर सतत तीन दिवस सामूहिक बलात्कार, दोघांना अटक, एक फरार

१६ वर्षाच्या मुलीवर सतत तीन दिवस सामूहिक बलात्कार, दोघांना अटक, एक फरार

Gang Rape: एका १६ वर्षाच्या मुलीवर यापासून तर नागपूरपर्यंत सतत तीन दिवस सामूहिक बलात्कार केल्याची घटना.

16-year-old girl gang rape Two Ames test one abstaining in Gondia

गोंदिया: गोंदिया शहरातील एका १६ वर्षाच्या मुलीवर यापासून तर नागपूरपर्यंत सतत तीन दिवस सामूहिक बलात्कार ( gang rape) करणाऱ्या तीन नराधमांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार आहे. ही कारवाई २८ जानेवारी रोजी करण्यात आली आहे.

गोंदिया शहरातील १६ वर्षाच्या एका मुलीला शहराच्या मामा चौकातून २४ जानेवारी रोजी उचलून तिला बांधतलाव येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दोन तासानंतर पुन्हा तिला मामा चौकात सोडण्यात आले. दुसऱ्याने लगेच तिला एमआयडी परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. रात्री ९ वाजताच्या सुमारास तिला पुन्हा मामा चौकात आणल्यावर तिला नागपूरच्या एका व्यक्तीकडे स्वाधीन करण्यात आले. त्याने नागपूर येथे नेऊन तिच्यावर २४ ते २७ जानेवारी या काळात अत्याचर करण्यात आला. तिला २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास गोंदियात सोडण्यात आले.

या प्रकरणात तीन नराधमांवर भादंविच्या कलम ३६३, ३७६, ३७६ (२), (एन), ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दोन आरोपींना पकडण्यासाठी गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्वरीत पाऊले उचलली. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजने यानच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामभाऊ व्होडे, पोलीस हवालदार अनिल कोरे यांनी आरोपींना अटक केली.

आरोपींना १० फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सामूहिक बलात्कार प्रकरणात गोंदिया सिंगलटोली आंबेडकर वॉर्ड येथील प्रशांत मुलचंद मोटघरे (२७) व ढाकणी येथील सौरभ ईश्वर मेश्राम (२३) या दोघांना अटक (Arrested) करण्यात आली. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना १० फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: 16-year-old girl gang rape Two Ames test one abstaining in Gondia

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here