Home अहमदनगर अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्ष सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्ष सक्तमजुरी

Ahmednagar | Rahuri: पोस्को अत्याचाराबद्दल (Abused) १० वर्ष सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा.

10 years of hard labor for abducting and abused a minor girl

अहमदनगर: राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आकाश बबन शिरसाठ वय २० रा. प्रसाद नगर राहुरी फॅक्टरी यास लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायद्यानुसार पोस्को अत्याचाराबद्दल १० वर्ष सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए. बरालीया यांनी हा निकाल दिला आहे.

या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनीषा केळगंद्रे- शिंदे यांनी पाहिले. मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात 1 जुलै, 2015 रोजी अल्पवयीन मुलीस आकाश बबन शिरसाठ याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळविल्याची फिर्याद दिली होती. पोलीस उपनिरीक्षक सी. आर. गावंडे यांनी गुन्ह्याचा तपास करून पीडित मुलीस 31 जुलै 2015 रोजी इंदापूर (पुणे) येथून आकाशच्या ताब्यातून सोडवले.

मुलीच्या जबाबावरून राहुरी पोलिसांनी अत्याचाराचा व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, पीडित मुलीची साक्ष, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तसेच वयासंदर्भात नगर परिषद राहुरी यांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकार पक्षाचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी आकाश शिरसाठ याला शिक्षा ठोठावली.

Web Title: 10 years of hard labor for abducting and abused a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here