Home अहमदनगर पाझर तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

पाझर तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

Rahata: पोहोण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून (drowned) मृत्यू (Dead).

youth who went swimming in Pazar lake drowned

राहता: राहता तालुक्यातील आडगाव येथील पाझर तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. चंद्रकांत सिताराम पठारे असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

दरम्यान एनडीआरएफची टीम व स्थानिक पोहिणाऱ्या तरूणांनी रविवारी सायकाळपर्यंत शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी एनडीआरएफची टिम व स्थानिक युवकांनी तलावाच्या खोलवर जावून शोध घेतला असता मृतदेह मिळून आला आहे. या घटनेने आडगाव परीसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  राहाता तालुक्यातील आडगाव येथील पाझर तलावात राजेंद्र गंगाधर पठारे व चंद्रकांत सिताराम पठारे हे दोघे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोहवायास गेले होते. दोघांनाही चांगले पोहता येत होते. तलाव यावर्षी पुर्ण क्षमतेने भरला असून पिंपरी लोकाईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.

पाण्याचा प्रवाह वेगवान आहे. हे दोघे या प्रवाहाच्या ठिकाणीच पाण्यात उतरले. दोघेही पाठोपाठ पोहत जात असताना मध्यभागी गेल्यानंतर चंद्रकांत अचानक गायब झाल्याचे राजेंद्र याच्या लक्षात आले. तो त्याला पाहण्यासाठी मागे गेला मात्र शोध घेवूनही चंद्रकांत मिळून न आल्याने राजेंद्र याने जवळच असलेल्या युवकांना ही माहिती दिली. त्यानंतर स्थानिक युवकांनीही पाण्यात त्याचा शोध घेतला.

मात्र तो मिळून आला नाही. त्यानंतर घटनेची माहिती राहाता तहसिलदार, लोणी पोलिसांना दिली. त्यानंतर शिर्डी येथील आपत्ती व्यवस्थापन पथक तेथे दाखल झाले. त्यांनी तलावात चंद्रकांत यांचा शोध घेतला मात्र सोमवारी सांयकाळपर्यंत तो मिळून आला नाही. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवुन मंगळवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात आला. स्थानिक तरूणांनी मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चंद्रकांत याचा मृतदेह शोधून पाण्याच्या बाहेर काढला. घटनास्थळरावर लोणी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.

या घटनेने आडगाव परीसरात शोककळा पसरली असून चंद्रकांत हा नोकरीनिमित्त पुणे येथे होता. मात्र करोनामुळे नोकरी गेल्याने दोन वर्षापासून तो कुटूबा समवेत आडगाव येथेच राहत होता.

Web Title: youth who went swimming in Pazar lake drowned

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here