Home क्राईम संगमनेरात साडे अकरा लाख रुपयाची चोरी

संगमनेरात साडे अकरा लाख रुपयाची चोरी

11 lakh rupees theft in Sangamner

संगमनेर | Theft: संगमनेर शहरालगत पावाबाकी रोड वर सुखवस्तूनिवास स्थानी बंद घराचा कडी कोंडा तोडून चोरी केल्याची घटना घडली आहे.

संगमनेर येथील पावाबाकी रोडवरील राजाराम सुपर शॉपी पाठीमागील संतोष मनसुबराव देशमुख यांच्या सुखवस्तू निवासस्थानी रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत कुलूप कोंडा तोडून घरातील ११ लाख ५० हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी सरोजिनी मनसुबराव देशमुख यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल मदने यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

Web Title: 11 lakh rupees theft in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here