Home महाराष्ट्र नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नाही, सरसकट उत्तीर्ण

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नाही, सरसकट उत्तीर्ण

11th and 9th student passed to Next year  

मुंबई: करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शिक्षण विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही तर या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षा न घेताच त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

याअगोदर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उतीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार आहे. वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षणविभागाने सांगितले आहे.

Web Title: 11th and 9th student passed to Next year  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here