Home अहमदनगर खळबळजनक: राहुरी येथील अपहरण झालेल्या पत्रकाराची हत्या

खळबळजनक: राहुरी येथील अपहरण झालेल्या पत्रकाराची हत्या

Rahuri Jornalist Rohidas Datir Murder

राहुरी | Murder: राहुरी येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांचे यांचे काल अपहरण झाल्याचे उघडकीस आले होते. बुधवारी सकाळी त्यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.

राहुरी येथील मल्हारवाडी रस्त्यावरून मंगल्वारू दुपारी स्कॉर्पियो मधून आलेल्या काही जणांनी दातीर यांचे अपहरण केले होते. ही माहिती राहुरी पोलिसांना समजताच पोलिसांनी शोधाशोध सुरु केली होती. मात्र पोलिसांना अपहरणकर्ते मिळून आले नाही. बुधवारी सकाळी दातीर यांचा मृतदेह राहुरी कॉलेज परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दातीर यांची हत्या नेमकी कोणी व कशासाठी केली असावी हे अद्याप समोर आले नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. मारेकरी शोधून काढण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहे. श्रीरामपूर येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून हत्या करण्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एका पत्रकाराचे अपहरण करून हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Rahuri Jornalist Rohidas Datir Murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here