Home अहमदनगर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली १३ कोटींना फसवले

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली १३ कोटींना फसवले

Ahmednagar News: शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एकाने तब्बल १३ कोटी ४९ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

13 crore cheated in the name of investment in the stock market

अहमदनगर: शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एकाने तब्बल १३ कोटी ४९ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शेअर मार्केट ट्रेंडिगच्या नावाखाली तब्बल तेरा कोटी 49 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार नगर शहरात समोर आला आहे. कंपनीतील गुंतवणुकीतून दर महिन्यांला पाच टक्के परतावा देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली. ठकबाजांनी पैसे परत करण्यास नकार देत गाशा गुंडाळल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका शैलेंद्र सुरपुरिया (वय 36, रा. देना बँक कॉलनी, सावेडी रस्ता, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

बाळासाहेब निवृत्ती काळे, भारती बाळासाहेब काळे व निहाल बाळासाहेब काळे (सर्व रा. रूपमाता नगर, सावेडी, अहमदनगर) या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका शैलेंद्र सुरपुरिया व त्यांच्या सहकार्‍यांनी आरोपींना वेळोवेळी बँक खात्यावर व रोख रकमेत साडेतेरा कोटी रुपये दिले. गुन्हा दाखल झालेल्या संशयित ठकबाजांनी शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी इडलवाईज ब्रोकर इंडिया लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्यांला पाच टक्के परताव्याचे आमिष दाखवित ही फसवणूक केली.

या आमिषाला बळी पडत तक्रारदार यांनी 2021 ते ऑक्टोंबर 2022 दरम्यान तब्बल 13 कोटी 49 लाख रुपयांची गुंतवणुक केली. मात्र, गुंतवणुकीनंतर पाच टक्के परताव्याची रक्कम काही महिन्यांनी देणे बंद केल्याने तक्रारदार यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली. तेव्हा आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही डबघाईला गेलो आहोत, असे सांगून गुंतवणुकीची रक्कम परत देण्यास साफ नकार दिला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी पसार झाला आहे. 

Web Title: 13 crore cheated in the name of investment in the stock market

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here