Home अहमदनगर कोपरगावात हॉटेलवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,  दोन परप्रांतीय मुलींची सुटका

कोपरगावात हॉटेलवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,  दोन परप्रांतीय मुलींची सुटका

Kopargaon Sex Racket:  हॉटेल कल्पतरू येथे सेक्स रॅकेट चालवून वेश्या व्यवसाय, येथे पथकाचा छापा (Raid), दोन परप्रांतीय मुलींची सुटका, हॉटेल चालकास अटक.

sex racket going on at a hotel in Kopargaon was exposed

कोपरगाव: शहरातील येवला रोडवर असलेल्या हॉटेल कल्पतरू येथे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी शुक्रवारी रात्री पथकासह छापा टाकून दोन परप्रांतीय तरुणींची सुटका केली. हॉटेल चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

संदीप मिटके, कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, हेकॉ. इरफान शेख, पोकॉ. कृष्णा कुहे, पोकॉ. दिनेश कांबळे, पोकॉ. गणेश काकडे, धराडे, आप्पासाहेब थोरमिसे यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे कोपरगाव शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

शिर्डी विभागाचे पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोपरगाव येथील हॉटेल कल्पतरू येथे सेक्स रॅकेट चालवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे. माहितीच्या आधारे नगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल कल्पतरूवर बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकण्यात आला.

यावेळी दोन पीडित परप्रांतीय मुलीची सुटका करण्यात आली आहे. हॉटेल चालक विजय मवाळ यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस स्टेशन येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Web Title: sex racket going on at a hotel in Kopargaon was exposed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here