अकोले: मधमाश्यांच्या हल्ल्यात १३ पर्यटक जखमी
Breaking News | Akole: पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटन, कोथरूड येथील १३ पर्यटक जखमी.
राजूर : हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या कोथळे येथील भैरवनाथ गडावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना रविवारी समोर आली आहे. या हल्ल्यात पुण्यातील कोथरूड येथील १३ पर्यटक जखमी झाले होते. काहींना लोणी येथे हलविण्यात आले होते, तर सात जणांना राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान, सोमवारी सकाळी राजूर येथील उपचारार्थ दाखल झालेल्या तरुणांना घरी सोडण्यात आले. शनिवारी रात्री पुणे कोथरूड येथून १३ पर्यटक भटकंती करण्यासाठी हरिश्चंद्रगड येथे आले होते. त्यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास हरिश्चंद्र गड अभयारण्य प्रवेश केला. पाचनई येथे चहा, नास्ता करून सर्व पर्यटक हरिश्चंद्र गडाजवळ असलेल्या कलाडगडावर पर्यटनासाठी सकाळच्या सुमारास निघाले होते. त्यानंतर हरिश्चंद्रगड परिसरात असलेल्या कोथळे येथील भैरवगडावर भटकंती करीत असताना दुपारी देवराईजवळ थांबले. नास्ता करीत असताना कुंडाजवळ आल्याने मधमाश्यांना हाकलून लावण्यासाठी त्यांनी गवत पेटून धूर केला. यानंतर मधमाश्यांनी हल्ला करून सर्वांना जखमी केले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळे यांनी तातडीने मदत केली.
Web Title: 13 tourists injured in bee attack
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study