Home क्राईम घरात अनाधिकृतरीत्या घुसून १३ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

घरात अनाधिकृतरीत्या घुसून १३ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

13-year-old girl sexually assault by entering the house illegally

हिंगोली | Hingoli: जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथील एका १३ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार (sexually assault) केल्याचा प्रकार समोर आल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही चिमुरडी या गावात तिच्या कुटुंबासह राहत होती. २२ तारखेला तिच्या कुटुंबातील सर्व जण शेतात गेल्याची संधी साधत आरोपी प्रवीण उत्तमराव पाईकराव याने चिमुरडीच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्या घरात अनाधिकृतरीत्या प्रवेश करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अत्याचार केल्यानंतर पीडित चिमुरडीस ही घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती. मात्र, आई- वडील शेतामधून घरी आल्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितल्याने तातडीने, या चिमुरडीच्या वडिलांनी आखाडा बाळापुर पोलिसात फिर्याद दिली आहे.

यानंतर बाळापूर पोलिसांनी तातडीने आरोपी नराधम प्रवीण उत्तम पाईकराव याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच आरोपी पसार झाला आहे. बाळापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: 13-year-old girl sexually assault by entering the house illegally

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here