Home क्राईम पत्रिकेत वराची डिग्री नाही, नवऱ्यानं लग्न मोडलं, नवरीनं घेतलं फिनाईल

पत्रिकेत वराची डिग्री नाही, नवऱ्यानं लग्न मोडलं, नवरीनं घेतलं फिनाईल

no groom's degree in the magazine, the husband broke up the marriage

पालघर | Palghar: वधू पक्षाच्या लग्न पत्रिकेत डॉक्टर असलेल्या वराची डिग्री छापली नसल्याचा राग मनात ठेवून लग्नाच्या दोन दिवस अगोदर पालघर येथील डॉ. जिनीतकुमार गावड याने नकार दिल्यामुळे मानसिक धक्का व होणाऱ्या अपमानामुळे नववधूने पालघरमधील तिच्या राहत्या फ्लॅटच्या शौचालयात फिनाईल प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न (Suicide) केल्याची घटना घडली. तिला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात वरा वर शनिवारी पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

24 एप्रिलला हळदीचा व 25 एप्रिलला दोघांचेही लग्न (Marriage) होणार होते. वधू ही सिव्हिल इंजिनियर असून ती वसई येथे नोकरीस आहे, तर वर जिनीत कुमार गावड हा विरारच्या एका नामांकित फार्मसी कॉलेजमध्ये लेक्चरर आहे.

2018 मध्ये सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमाद्वारे मुलगी व डॉ.गावड यांची ओळख झाली. तेथून त्यांचे प्रेम संबंध जुळले. 25 एप्रिल 2022 रोजी त्यांचे पालघरच्या रिसॉर्टमध्ये लग्न ठरले होते.. 19 एप्रिल रोजी परंपरेनुसार वधूचे वडील आणि आई हे वराचे वडील बबन गावड आणि आई विभा यांना पहिले निमंत्रण पत्रिका देण्यासाठी गेले. पत्रिकेवर वधूची पदवी छापली व वराची पदवी छापली नसल्याने वराला राग आल्याने त्याने रागातून ऐन लग्नाच्यावेळी लग्नाला नकार दिला, असे वधू पक्षाने तक्रारीत म्हटले आहे. 20 एप्रिल रोजी वर जिनीतकुमार याने पीडितेला भेटीसाठी बोलावले आणि त्यादरम्यान त्याने तिला अटी व शर्तींची यादी दिली आणि त्यानंतरच तो तिच्याशी लग्न करेल अशी अट ठेवली. मात्र अटी मान्य नसल्याचे तिने म्हटले, त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला.

1 मार्च रोजी डहाणू येथील एका रिसॉर्टमध्ये नेऊन वराने तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार (Sexual assault) केला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. वराच्या आई-वडिलांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचा तिचा आरोप असल्याचे दाखल असलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पालघर पोलिसांनी कलम ३७६ (बलात्कार | Rape), ४१७, ४२० (Fraud), ३०६ (Suicide), ३२३ (दुखापत करणे) अन्वये डॉ.गावड, त्याचे आई-वडील, बबन आणि विभा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र  तिघेही फरार आहेत. पालघर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: no groom’s degree in the magazine, the husband broke up the marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here