Home महाराष्ट्र Accident: ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक बसून अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Accident: ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक बसून अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Travels two-wheeler accident The cyclist died on the spot 

बीड: बीड अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची ( Beed Accident Serial) मालिका सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी अपघातात ७ जण ठार झाले होते.  अंबाजोगाई – लोखंडी सावरगाव महामार्गावर ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.

तुषार कोपले असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून अंबाजोगाईलगत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहेत. महामार्गाचा रस्ता अरुंद आणि रस्त्याच्या मधोमध डिवायडर नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळं रस्त्याचं रुंदीकरण करून रस्त्याच्या मधे डीव्हायडर बसवावेत, अशी मागणी नागरिक करीत आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच (ता. 23) बीडमध्ये ट्रक व क्रूझर मध्ये एक मोठा अपघात झाला होता. या अपघातात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. भरधाव वेगात असलेल्या ट्रक व क्रूझर जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात, 7 प्रवासी जागीच ठार झाले होते.

Web Title: Travels two-wheeler accident The cyclist died on the spot 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here