Home पुणे Rape | नात्याला काळीमा फासणारी घटना: वडिलांनीच केला १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

Rape | नात्याला काळीमा फासणारी घटना: वडिलांनीच केला १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

14-year-old girl rape by father

पुणे | Pune Crime: वडिलांनी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन असून देखील लग्न करायचे नसताना तिच्या मनाविरुद्ध लग्न ठरविल्याने मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

याप्रकरणी हडपसरयेथील साडेसतरानळी येथील एका १४ वर्षीय मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सदर प्रकार हा राहत्या घरी १८ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादीचे वडील हे तिला वेळोवेळी स्पर्श करून छळ करीत असे. तिची आई घरी नसल्याचा फायदा घेत त्याने फिर्यादीवर फेब्रुवारी मध्ये जबरदस्तीने शारीरिक संबध केले. त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. ३ मार्च रोजी त्याने पुन्हा असा प्रकार केला. या प्रकाराबाबत तिने आईला सांगितले. आईने वडिलांना जाब विचारला असता तेव्हा तिच्या आईला देखील मारहाण केली. तसेच तक्रार न देण्याची धमकी दिली. फिर्यादी यांना लग्न करायचे नसताना देखील तिच्या मनाविरुद्ध लग्न ठरविले. यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के अधिक तपास करीत आहे.

Web Title: Shocking 14-year-old girl rape by father

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here