Home Ahmednagar Live News Accident | मारूती कारचा अपघात, दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Accident | मारूती कारचा अपघात, दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Two killed in Maruti car accident

पारनेर | Parner:  नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर सावरगाव  नजीक काळेवाडी शिवारात मारूती कारचा अपघात (Accident) झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष लोंढे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

या अपघातात राहुल पंढरीनाथ गोडसे (रा. गोडसेवाडी), ऋषीकेश साहेबराव ओटी (रा. व्हरोंडी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत राहुल गोडसे या तरूणाला फीट आल्याने त्याला बुधवारी (दि. 25) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास टाकळी ढोकेश्वर येथे रुग्णालयात घेऊन जात असताना मारूती कार पलटी झाली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

Web Title: Two killed in Maruti car accident

Previous articleRape | नात्याला काळीमा फासणारी घटना: वडिलांनीच केला १४ वर्षीय मुलीवर बलात्कार
Next articleपत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन निर्घृण हत्या करणार्‍या पतीस  राजूर पोलिसांनी केली अटक – Murder Case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here