राजूर | Rajur: अकोले तालुक्यातील शेलविहिरे येथे स्वतःच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीची निर्घृण हत्या (Murder) करणार्या पतीस पुणे जिल्ह्यातून राजूर पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.
दि. 19 ते 20 मे दरम्यान तालुक्यातील शेलविहिरे येथे आरोपी जगन्नाथ भागा आडे (वय 46) याने स्वतःची पत्नी रंजना जगन्नाथ आडे हिस चारित्र्याच्या संशयावरून खोरे व दांड्याच्या साह्याने जबर मारहाण करून तिला जीवे ठार मारले.
याबाबत जालिंदर जगन्नाथ आडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगन्नाथ भागा आडे याच्याविरुद्ध राजूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा घडल्यापासून आरोपी हा फरार होता मात्र राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी याबाबत तातडीने तपासाची सूत्र फिरवत या आरोपीचा शोध सुरू केला असता सदर गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक तपासा वरून तसेच गोपनीय माहिती मिळाल्या नुसार आरोपी जगन्नाथ आडे हा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव तालुका शिरूर येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यानुसार राहुल मदने उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर चे पथक शिरूर येथे रवाना होऊन माहिती घेतली असता एका खोलीमध्ये तो वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सदर ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता आरोपी याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निर्घृणपणे खून केल्याचे सांगितले. सदर आरोपीने यापूर्वी देखील पत्नीवर अशाच प्रकारे हल्ला करून तिला गंभीर दुखापत केली होती. या गुन्ह्यात त्याला दहा वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेतून तो 2011 ला बाहेर आला आहे मात्र पुन्हा एकदा त्याने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून (murder) केला.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राहुल मदने, राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या पथकाने सदर आरोपीस शिताफीने अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Web Title: Husband arrested by Rajur police for murder his wife