Home पुणे संतापजनक घटना: मामाकडून १४ वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

संतापजनक घटना: मामाकडून १४ वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

14-year-old niece sexually abused by uncle

Pimpari | पिंपरी: मामाने १४ वर्षीय अल्पवयीन भाचीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार (Sexually abused) केल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या मावस भावाने अत्याचाराचा हा प्रकार पहिला असता मामाने त्यालाही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार पिंपरी परिसरात १७ जून ते २६ जून आणि १ जुलै रोजी घडला.

याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार २९ वर्षीय मामाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मामाने भाचीवर वेळोवेळी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी मामा हा भाचीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करीत असताना भाची ओरडली. त्यावेळी मावस भाऊ तेथे आला. मामाने त्यालाही मारहाण केली. त्यावेळी आरोपी मामाने फिर्यादीच्या घरातील कपाटाच्या काचा फोडून नुकसान केले.

Web Title: 14-year-old niece sexually abused by uncle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here