Home अहमदनगर Accident | अहमदनगर ब्रेकिंग: कार व बसचा अपघात

Accident | अहमदनगर ब्रेकिंग: कार व बसचा अपघात

 

Shrirampur Car and bus accident

Shrirampur | श्रीरामपूर: श्रीरामपूर आगाराची एस टी महामंडळ बस आणि कार यांच्यात अपघात (Accident) झाला असून यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. तालुक्यातील खैरी निमगाव येथील तीनचारीजवळ हा अपघात झाला.

श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील तिनचारी जवळ श्रीरामपूरहून वैजापूरकडे जाणारी श्रीरामपूर डेपोची (एमएच 14 बीटी 2241) ही बस आणी श्रीरामपूरच्या दिशेने जाणारी वेन्टोकार (एमएच 17 बीव्ही 3310) यांच्यात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात एकही जण जखमी  झाला नाही. श्रीरामपूरहून येणार्‍या वैजापूर बसचे चालक अहमद शहा शब्बीर शहा हे होते तर वेन्टोकार चालक देवळाली प्रवराचे आसाराम रंगनाथ ढुस हे होते. अपघातात बस व वेन्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खैरी निमगाव येथील तिनचारी परिसरात यापुर्वी अनेक अपघात झालेले आहेत. या ठिकाणी गतीरोधक बसविण्याची आवश्यकता आहे. यापुर्वी येथे गतीरोधक होते मात्र ते काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहीती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार मोहन शिंदे आणी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी वारे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला.

Web Title: Shrirampur Car and bus accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here