Home महाराष्ट्र नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात

Nashik division graduate constituency: अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

16 candidates in Nashik division graduate constituency

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी ही माहिती दिली आहे.

अमोल बाळासाहेब खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धंजनय क्रिष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या सहा उमेदवारांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे.

हे आहेत उमेदवार, यामध्ये रंगणार सामना:–

1) रतन कचरु बनसोडे, नाशिक वंचित बहुजन आघाडी,

2) सुरेश भिमराव पवार, नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी,

3) अनिल शांताराम तेजा, अपक्ष,

4) अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर,धुळे अपक्ष,

5) अविनाश महादू माळी, नंदूरबार अपक्ष,

6) इरफान मो इसहाक, मालेगाव जि.नाशिक अपक्ष,

7) ईश्वर उखा पाटील, धुळे अपक्ष,

8) बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक, अपक्ष,

9) ॲड. जुबेर नासिर शेख, धुळे अपक्ष,

10) ॲड.सुभाष राजाराम जंगले, श्रीरामपुर, अपक्ष,

11) सत्यजित सुधीर तांबे,संगमनेर, अपक्ष,

12) नितीन नारायण सरोदे, नाशिक अपक्ष,

13) पोपट सिताराम बनकर, अहमदनगर, अपक्ष,

14) शुभांगी भास्कर पाटील,धुळे अपक्ष,

15) सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर, अपक्ष,

16) संजय एकनाथ माळी, जळगाव,अपक्ष

असे एकूण १६ उमेदवार निवडणुक लढविणार आहेत.

३० जानेवारीला मतदान तर २ फेबुवारीला मत मतमोजणी होणार आहे.

Web Title: 16 candidates in Nashik division graduate constituency

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here