Home संगमनेर न्यायावर माझा विश्वास, चौकशीअंती सत्य समोर येईल: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

न्यायावर माझा विश्वास, चौकशीअंती सत्य समोर येईल: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

Sudhir Tambe | Nashik Graduate Constituency Election: माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल.

belief in justice, the truth will come out after investigation Sudhir Tambe

संगमनेर : माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे, असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर देखील उमेदवारी अर्ज दाखल न करणाऱ्या आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे यासंदर्भात आमदार तांबे यांनी एका ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली.

नाशिक पदवीधर मतदार संघात महा विकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता सत्यजित तांबे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच आपण काँग्रेस असल्याचे स्पष्ट करत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण भाजपसह अन्य सर्व पक्षाच्य प्रमुखांना विनंती करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले होते. तांबे यांची अपक्ष उमेदवार आणि परंपरागत या मतदार संघावर दावा सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने देखील या ठिकाणी आपला उमेदवार दिला नाही. उलट तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास तो देण्याची तयारी दाखवली. यामुळे सत्यजित तांबे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात होते. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला काँग्रेस पक्षाने विरोध दाखविल्याने तसेच शिवसेनेने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याने निवडणुकीत चूरस वाढली होती. दरम्यान काँग्रेसने उमेदवारी देऊन देखील डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात होती. रविवारी पक्षाने चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर तांबे यांनी माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे. असे म्हटले आहे.

Web Title: belief in justice, the truth will come out after investigation Sudhir Tambe

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here