Home क्राईम संगमनेर ब्रेकिंग: समनापूर दगडफेक प्रकरणी १७ जणांवर कारवाई, सुनावली पोलीस कोठडी

संगमनेर ब्रेकिंग: समनापूर दगडफेक प्रकरणी १७ जणांवर कारवाई, सुनावली पोलीस कोठडी

Sangamner Crime:  समनापुर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून संगमनेर आणि राहता तालुक्यातील १७ जणांना ताब्यात घेऊन त्यांना अटक (Arrested).

17 persons from Sangamner and Rahta talukas were detained and arrested

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून संगमनेर आणि राहता तालुक्यातील १७ जणांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे.

संगमनेर शहरातील भगवा मोर्चा संपल्यानंतर माघारी जाणाऱ्या हिंदू समाजाच्या तरुणांना शिवीगाळ झाली. यानंतर झालेल्या दगडफेकीत दोन वयस्कर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

यातील हुसेन फकीर मोहंम्मद शेख (वय ७५) यांना पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दगड फेकीत परिसरातील छोट्या-मोठ्या वाहनांच्या काचा फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे समनापुर येथील वातावरण तणावपूर्ण बनले.

मात्र, वेळीच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिराने जखमी इस्माईल फकीर मोहंमद शेख यांच्या फिर्यादीवरुन सत्यम भाऊसाहेब थोरात, सुनील बाबासाहेब थोरात, ललीत अनिल थोरात, प्रमोद संजय थोरात, दत्तात्रय संपत थोरात, आबासाहेब शिवराम थोरात, (रा. वडगाव), अवीराजआनंदा जोंधळे, विकास अण्णासाहेब जोंधळे, भाऊसाहेब यादव जोंधळे (तिघेही रा.कोकणगाव), कुणाल ईश्वर काळे, करण ज्ञाने श्वर काळे, (दोघेही रा. माळेगाव हवेली), वैभव रंगनाथ शिंदे रा.मनोली), शुभम बाळासाहेब कडू ऋषीकेश शरद घोलप, तनोज शरद कडू, महेश विजय कडू, (चौघेही रा.पाथरे, ता.राहाता) अशा सतरा जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: 17 persons from Sangamner and Rahta talukas were detained and arrested

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here