Home क्राईम प्रियकराच्या मदतीने कट,लेकीने घेतला बापाचा जीव, वेब सिरीज पाहून कट

प्रियकराच्या मदतीने कट,लेकीने घेतला बापाचा जीव, वेब सिरीज पाहून कट

Pune Crime: नात्याला काळिमा फासणारी घटना पुणे येथून समोर आली आहे. प्रेमाला वडिलांचा विरोध, त्यातून आईशी भांडणे, यातून अल्पवयीन मुलीने प्रियकर व आईच्या मदतीने वडिलांचा खून (Murder) करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार समोर.

With the help of lover, cut, Leki Murder of father

पुणे: प्रेमाला वडिलांचा विरोध, त्यातून आईशी भांडणे, यातून अल्पवयीन मुलीने प्रियकर व आईच्या मदतीने वडिलांचा खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. क्राइम वेब सिरीज पाहून त्यांनी हा कट रचला होता. पोलिसांनीही २३० सीसीटीव्ही फुटेज सलग चार दिवस पाहून गुन्हा उघडकीस आणला.

जॉन्सन कॅजीटन लोबो (वय ४९, रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (४३), मुलीचा प्रियकर ॲग्नेल जॉय कसबे (२३) यांना न्यायालयाने ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. केला. मुलीला ताब्यात घेतले आहे.

जॉन्सन यांच्या १७ वर्षांच्या मुलीचे ॲग्नेल कसबे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. जॉन्सनचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. 30 मे रोजी रात्री डोक्यात वरवंटा मारून व मानेवर चाकूने वार करून खून केला.

मृतदेह एक दिवस घरात ठेवला. नंतर कारने सणसवाडीजवळील एका पेट्रोल पंपाच्या अलीकडे नाल्यात टाकून पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

असा लागला छडा:

मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चार दिवस अन् रात्री जागून २३० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात एका कारच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. ती गाडी वडगाव शेरीची असल्याचे कळले. मालकाचा शोध घेतल असता गाडी ॲग्नेलने नेली असल्याचे समजले. मग खुनाचा छडा लागला.

Web Title: With the help of lover, cut, Leki Murder of father

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here