Sangamner News: आपल्या दुचाकीच्या डिक्की मध्ये रोख रक्कम असल्याने त्यांनी दुचाकीची डिक्की उघडून बघितले असता डिक्कीतून रक्कम गायब (Theft) झाल्याचे समोर.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील युनियन बँकेच्या समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून 2 लाख 13 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. याबाबत शहर पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका कंपनीतील कर्मचारी शरद रमेश गुजराती हे सव्वा पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन समनापुर येथील एका स्टील व्यापाऱ्यास देण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी तीन लाख रुपये दिले. तसेच शिल्लक रक्कम आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून ते समनापुर घुलेवाडी रस्त्याने घुलेवाडीतील युनियन बँकेमध्ये आले होते. बँकेच्या आवारामध्ये दुचाकी उभी करून ते बँकेत गेले असता आपल्या कामास वेळ लागण्याची शक्यता दिसल्याने ते पुन्हा बाहेर आले. आपल्या दुचाकीच्या डिक्की मध्ये रोख रक्कम असल्याने त्यांनी दुचाकीची डिक्की उघडून बघितले असता डिक्कीतून रक्कम गायब झाल्याचे समोर आले. त्यांनी आसपास चौकशी केली असता दोघेजण दुचाकीवरून सुसाट वेगाने तेथून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे या दोघा अज्ञातांनी दुचाकीच्या डिक्कीतील रोकड लांबविल्याची शक्यता बळावल्याने त्यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार या संदर्भात अधिक तपास करीत आहेत.
Web Title: 2 lakh 13 thousand rupees cash theft from the trunk of a motorcycle
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App