थायलंडमधून आलेल्या महिलेने मसाज पॉर्लरच्या नावाखाली सुरु केला वेश्याव्यवसाय
Pune Prostitution Business: कोरेगाव पार्कसारख्या भागात सुरु असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड पोलिसांनी केला.
पुणे : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी चिंचवड या भागात घडत आहेत. पुणे शहरातील काही भागात वेश्याव्यवसाय सुरु आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे व्यवसाय सुरु आहे. पुणे शहरातील कोरेगाव पार्कसारख्या भागात सुरु असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड पोलिसांनी केला होता. या ठिकाणी थायलंडमधून आलेल्या महिलेने मसाज पॉर्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु केला होता.
पुणे पोलिसांनी कोरेगाव पार्कमध्ये मारलेल्या छाप्यात तीन महिलांची सुटका केली होती. त्यातील एक महिला थायलंडमधून टुरुस्टी व व्हिसा काढून आली. पुण्यात कोरेगाव पार्कसारख्या भागात बस्तान मांडला. मग तिने मसाज पॉर्लरचा बोर्ड लावून थाई मसाज सुरु केली.
पुणे शहरातील कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू परिसर आहे. या भागात आशियाना पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. या सोसायटीतील फेमिना स्पा मध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी छापा टाकला. त्यांना तीन महिला वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. त्यापैकी एक महिला थायलंडमधील होती.
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. ती व्हिसा संपलेल्या असताना थांबली असल्याचे स्पष्ट झाले. भारत आणि थायलंडमध्ये असलेल्या करारामुळे तिला अटक करण्यात आली नाही. परंतु तिला कायमचे ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले. तिला पुन्हा थायलंडमध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तिला थायलंडला पाठवण्यात येणार आहे.
Web Title: woman started prostitution under the name of massage parlour
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App