Home औरंगाबाद सहलीला आलेल्या २ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू

सहलीला आलेल्या २ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू

Aurangabad: लाटांचा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू (drowned) लागले, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाचे विद्यार्थी. 

2 students on a trip drowned in the sea

अलिबाग: समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने जीव गमविण्याची वेळ अनेकांवर येते. अशीच वेळ औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर आली. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या सहा विद्यार्थ्यांपैकी दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिस आणि जीवरक्षकांमुळे चार जण वाचले असून त्यांच्यावर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही सर्व परिस्थिती पाहून इतर दोन विद्यार्थिनी अस्वस्थ झाल्या होत्या. आल्या. त्यांच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाचे दहावीचे ७० मुले मुली पाच शिक्षकांसोबत रायगड जिल्ह्यात एसटीने पर्यटनास दोन दिवसांपूर्वी आले होते. मुरुड, जंजिरा पाहून दोन्ही बस मुलांना घेऊन सोमवारी सकाळी अकरा वाजता काशीद समुद्रावर विद्यार्थ्यांना समुद्र पाहून पोहण्याचा मोह आवरला नाही. मात्र, हा मोह आपल्या जीवावर बेतेल याची सुतराम शक्यता त्यांना नव्हती. सायली राठोड, कृष्णा पाटील, तुषार हरिभाऊ वाघ, प्रणव कदम, रोहन महाजन, रोहन संतोष बेडवाल हे समुद्रात पोहण्यास उतरले. मात्र, लाटांचा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब उपस्थितांना कळल्यावर त्वरित त्यांना वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली. यामध्ये सायली, कृष्णा, तुषार, रोहन यांना वाचविण्यात यश आले. मात्र, प्रणव आणि रोहन यांना वाचविता आले नाही.

Web Title: 2 students on a trip drowned in the sea

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here