Home क्राईम Murder: पत्नीला वादग्रस्त बोलल्याने मित्राची गोळी झाडून हत्या

Murder: पत्नीला वादग्रस्त बोलल्याने मित्राची गोळी झाडून हत्या

Hingana Murder News: पत्नीला वादग्रस्त बोलल्याने मित्राची गोळी झाडून हत्या.

Murder friend was shot dead for speaking controversially to his wife

हिंगणा: पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने मित्राला रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घरी बोलावून त्याच्याशी पत्नी व इतर मित्रांसमोर भांडायला सुरुवात केली. पत्नी चिडताच त्याने मित्रावर पिस्तूल रोखले आणि दोन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. ही घटना हिंगणा शहरात घडली. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

अविनाश अशोक घुमडे (३२) असे मृताचे, तर दीपक घनचक्कर ऊर्फ खट्या (३८) असे फरार आरोपीचे नाव आहे. अविनाश व दीपक मित्र असून, हिंगण्यात राहायला आल्यानंतर त्या दोघांची मैत्री घट्ट झाली. अविनाशने काही दिवसांपूर्वी दीपकच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याबाबत कळताच दीपकने त्याच्या पत्नीला विचारणा केली होती. त्याने रविवारी रात्री अविनाशला त्याच्या घरी बोलावले. वंश ढगे (१८) नामक तरुणाला सोबत घेऊन अविनाश दीपकच्या घरी पोहोचला.

पत्नीसमोर अविनाशसोबत भांडायला सुरुवात केली. दीपकची पत्नी अविनाशवर सर्वांसमोर चिडताच दीपकने त्याच्यावर पिस्तूल रोखले आणि दोन गोळ्या झाडल्या. दोन्ही गोळ्या छातीत शिरताच अविनाश कोसळला आणि वंशने तिथून पळ काढला. दीपक व त्याच्या साथीदारांनी वंशला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, दीपकने तीन-चार साथीदार व तो दीपकला सापडला नाही.

वंशने गाठले पोलिस ठाणे

वंश ढगे हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्याने घटनास्थळाहून पळ काढत लगेच हिंगणा पोलिस ठाणे गाठले. सहायक पोलिस निरीक्षक गजानन तेलरांधे यांना संपूर्ण हकीकत सांगितली. सुरुवातीला त्यांचा वंशच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. पोलिसांनी वंशला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. तोपर्यंत आरोपी तिथून पळून गेले होते, तर खोलीत अविनाश रक्ताच्या थारोळ्यात पडून होता.

Web Title: Murder friend was shot dead for speaking controversially to his wife

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here