Home क्राईम Rape Case: २० वर्षीय तरुणीवर रिक्षात बलात्कार, आरोपीला अटक

Rape Case: २० वर्षीय तरुणीवर रिक्षात बलात्कार, आरोपीला अटक

Rape Case:  गोरेगाव येथे एका रिक्षात २० वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

20-year-old girl rape in a rickshaw, accused arrested

मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधम रिक्षाचालकाने एका २० वर्षीय तरुणीवर रिक्षात बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोपीला उत्तर परदेशातून अटक करण्यात आली आहे. इंद्रजित सिंह असे या नराधम आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो मुंबईत रिक्षा चालवतो. पीडित महिला ही काही दिवसांपूर्वी सीबीडी बेलापूर येथे तिच्या मावशीच्या घरी गेली होती. तिथून तिनं घरी परतण्यासाठी तिने नवी मुंबई ते गोरेगाव अशी रिक्षा बुक केली. दरम्यान, रिक्षात बसल्यावर रिक्षाचालकाने आरे कॉलनीत येताच रिक्षा निर्जनस्थळी थांबवली. यावेळी त्याने पीडित महिलेला मारहाण केली. या नंतर तिला धमकावत तिच्यावर रिक्षातच बलात्कार केला. तसेच या बाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीने तरुणीला दिली. यानंतर आरोपी हा उत्तर प्रदेशात पळून गेला.

दरम्यान भीतीपोटी महिलेने हा प्रकार कुणाला सांगितला नाही.  काही दिवसांपूर्वी महिलेची प्रसूती झाली. यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याने तिला घरच्यांनी दवाखान्यात नेले. यावेळी डॉक्टरांना तिच्या शरीरावर जखमा दिसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली. दरम्यान, तिला या बाबत पीडितेला विचारले असता ती घाबरली. कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेतल्यावर तिने तिच्यावर घडलेला प्रसंग कथन केला. यानंतर कुटुंबीयांनी थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी महिलेकडून माहिती घेऊन या प्रकरणी तपास सुरू केला. पोलिसांनी रिक्षाच्या मालकाला आधी अटक केली. त्याच्या कडून आरोपीची माहिती घेतली. यानंतर पोलिसांनी पथक तयार करत नराधम आरोपीला उत्तर प्रदेशात जाऊन अटक केली. आरोपीला मुंबईत आणण्यात आले असून सध्या त्याला पोलिस कोठडी (Police custody) देण्यात आली आहे.

Web Title: 20-year-old girl rape in a rickshaw, accused arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here